Breaking News

 

 

मोदी-शहांविरोधातील तक्रारींवर सोमवारपूर्वी निर्णय द्या : सुप्रीम कोर्ट

वी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातील आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींवर ६ मे पूर्वी निर्णय घ्यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने आज (गुरुवार) निवडणूक आयोगाला दिले. काँग्रेसने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघनाच्या ११ तक्रारी दाखल केल्या होत्या. यापैकी मोदींविरोधातील दोन तक्रारींसंदर्भात निवडणूक आयोगाने नुकताच निकाल दिला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये मोदींना क्लीन चीट मिळाली होती. 

आम्ही ११ पैकी २ तक्रारींबाबत निर्णय दिला आहे. सोमवारी मतदान असल्याने तक्रारींबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारपर्यंतचा कालावधी द्यावा, अशी विनंती निवडणूक आयोगातर्फे करण्यात आली. मात्र, ही विनंती सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे मोदी आणि शहा यांचेविरुद्ध त्वरित निर्णय देणे आयोगावर बंधनकारक झाले असून य़ा पार्श्वभूमीवर आयोगाच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

243 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा