राधानगरी (प्रतिनिधी) : आ.प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून तिटवे, ता.राधानगरी येथे आरोग्य उपकेंद्र इमारत बांधणेसाठी 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून आज तिटवे ग्रामस्थांनी गारगोटी येथील संपर्क कार्यालयात आबिटकरांची भेट घेत आभार मानले.

या उपकेंद्राच्या इमारतीकरीता गायरानमधील 25 गुंठे क्षेत्र खास बाब म्हणून मंजूर करण्यात आले आहे. याकरीता माजी उपसभापती अरुणराव जाधव व गावातील सर्वच मान्यवरांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळेच आरोग्य उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध झाली. या आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून गावातील नागरीकांना आरोग्य विषयक सोईसुविधा अधिक सुलभतेने उपलब्ध होणार आहे.

यावेळी कोकण केसरी के.जी.नांदेकर, माजी उपसभापती अरुणराव जाधव, उपमहाराष्ट्र केसरी नंदु आबदार, सरपंच सचिन आबदार, उपसरपंच रमेश घारे, ग्रा.पं.सदस्य विकास घारे, राजेंद्र जितकर, अशोक घारे, सुनिल पाटील, कृष्णात पाटील, शिवाजी बागडे, उत्तम पाटील, डॉ.धनाजी चौगले, शशिकांत चोगले, रणजित आबदार, धनाजी घारे, तानाजी भांग यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.