कागल (प्रतिनिधी) : ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुदान मिळण्यासाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांचा शेतकऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी केलेल्या या कृतज्ञतापर सत्काराने आमदार मुश्रीफ भारावले.

आ. मुश्रीफ म्हणाले, याआधीच्या महाविकास आघाडी सरकारने थकीत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ आणली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुदान देण्याचे घोषित केले होते. दरम्यान; कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे ते देता आले नव्हते. दरम्यान; ३० जून २०२२ रोजी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यामुळे हे अनुदान देता आले नव्हते. त्याच पुरवणी मागणीचे पैसे आता या शासनाकडून दिले जात आहेत. दरम्यान आलेले हे अनुदान ५० टक्केच शेतकऱ्यांना दिले आहे.

कुणाचेही नाव न घेता आ. मुश्रीफ म्हणाले, दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे डिजिटल बोर्ड लावून श्रेय घेण्यापेक्षा कामास काम उभे करा आणि विधायक पद्धतीने आव्हान द्या. जरुरतसे ज्यादा इमानदार हुँ मै, इसीलिए बहुत लोगों के नजरोमें गुन्हेगार हूँ मै..!

यावेळी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ, युवराज पाटील, जि.प. चे माजी सदस्य मनोजभाऊ फराकटे, वसंतराव धुरे, काशीनाथ तेली, शिरीष देसाई, रघुनाथ कुंभार, नामदेवराव एकल, देवानंद पाटील, दीपक देसाई, नेताजी पाटील, मारुतीराव घोरपडे, बाळासाहेब देसाई, ॲड. अरुण पाटील, सूर्यकांत पाटील, दत्ता पाटील, कागल तालुकाध्यक्ष विकास पाटील, पं.स.चे माजी शशिकांत खोत, विठ्ठल भोपळे, सदानंद पाटील आदी उपस्थित होते.