Breaking News

 

 

वारकरी संप्रदायाला पालकमंत्र्यांच्या निधीतून ध्वनीक्षेपक यंत्रणा प्रदान : नाथाजी पाटील

गारगोटी (प्रतिनिधी) : धार्मिक केंद्रे ही सुसंस्काराची केंद्रे बनली पाहीजेत. यासाठी पालकमंत्री नाम. चंद्रकांतदादा पाटील यांचा नेहमीच आग्रह असतो. अशा केद्रांना मदत करण्यासाठी चंद्रकांतदादा नेहमीच अग्रेसर असतात. अशाच आग्रहातून भाटीवडे गावातील वारकरी संप्रदायासाठी पालकमंत्री नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निधीतून अत्याधुनिक ध्वनीक्षेपक यंत्रणा प्रदान करण्यात येत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले. ते भाटीवडे (ता.भुदरगड) येथे वारकरी संप्रदायास ध्वनिक्षेपक यंत्रणा प्रदानावेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अनंतराव डोंगरकर हे होते. तर मौनी विद्यापिठाचे सदस्य अलकेश कांदळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, भाटीवडे येथे ८४ वर्षांची वारकरी सांप्रदायिक परंपरा आहे. अशी परंपरा जपली जावून गावांमध्ये भागवत धर्माची पताका चिरंतन ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. यासाठी मोठ्या तपश्चर्येची आवश्यकता असते. अशी तपश्चर्या भाटीवडेकरांनी केली ही अभिमानाची गोष्ट आहे. अशा परंपरेने युवकांना निश्चित प्रेरणा मिळेल, असे सांगितले.

यावेळी भूदरगड तालूका संघाचे संचालक संतोष पाटील, भाजयुमोचे रणजित आडके, पी.बी. खुटाळे, प्रविण पाटील, दिपक पाटील, विनोद मोरे, चंद्रकांत नलवडे, बाळासो संतु साळोखे, साताप्पा सुतार, अरुण कडव, खंडेराव दबडे, बाबुराव गोजारे, विकास कडव, वारकरी, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

698 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग