बोरपाडळे (प्रतिनिधी) : येथील आरोग्य केंद्रात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शिबिर झाले. या शिबिराचे उद्घाटन माजी जि.प. सदस्य प्रा. शिवाजी मोरे यांच्या हस्ते झाले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. अहिल्या कणसे यांनी प्रास्ताविकात शिबिराचे महत्व सांगितले. पर्यवेक्षक संपत पाटील यांनी स्वागत केले. मानसोपचारतज्ञ डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी सुमारे ५० रुग्णांची तपासणी करून उपचार व मार्गदर्शन केले. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत सेवा रुग्णालय बावडा-कोल्हापूरचे मानसशास्त्रज्ञ उदयसिंह माने, चारुशीला भास्कर, पूजा साळुंखे, दीपाली मर्ये, स्वप्नील मदने, सर्जेराव संकपाळ आदींनी सहभाग घेतला. कोडोलीचे सपोनि शीतलकुमार डोईजड व कर्मचारी, आरोग्यसेवक, परिचारिका गटप्रवर्तक आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. पर्यवेक्षक जी. जी. पाटील यांनी आभार मानले.