Breaking News

 

 

जि. प. तर्फे दिव्यांग उन्नती अभियानांतर्गत ११ मे पासून तपासणी शिबिर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचा एक सर्वे करण्यात आला. या सर्वेनुसार २१ दिव्यांगाच्या प्रकारांमध्ये एकूण ४५१३६ दिव्यांगांची नोंद झाली आहे. त्यांच्यासाठी जिल्ह्यातील बारा तालुक्‍यांसह कोल्हापूर महानगरपालिका व इचलकरंजी नगरपालिका येथे तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला.

सदर शिबिर ११ मे ते २६ मे २०१९ या कालावधीत सकाळी साडेआठ ते ५ या वेळेत घेण्यात येणार आहे. शिबिराची ठिकाणे पुढीलप्रमाणे – : गारगोटी (ता. भुदरगड) – ११ मे, राधानगरी – १२ मे, आजरा – १३ मे, चंदगड – १४ मे, गगनबावडा – १५ मे, इचलकरंजी नगरपालिका – १६ मे, कागल – १७ मे, पन्हाळा – १८ मे,  शिरोळ – २० मे, शाहूवाडी – २१ मे, हातकणंगले – २२ मे, गडहिंग्लज – २४ मे, कोल्हापूर (मनपा) – २५ मे, करवीर – २६ मे

या शिबिरासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, दिल्लीकडून अलिम्को कंपनीच्या माध्यमातून २०  डॉक्टरांची विशेष टीम शिबिरातील दिव्यागांची तपासणी करणार आहे. ज्यांच्याकडे अपंगत्व प्रमाणपत्र नाही त्यांची तपासणी करून त्यांनाही या शिबिरात अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांना व्हीलचेअर, ट्रायसिकल, कुबड्या, एल्बो क्रचेस, रोलेटर, कॅलिपर, कृत्रिम अवयव, श्रवणयंत्र, एम. आर. किट स्मार्ट कॅन, लो व्हिजन किट, डायसी प्लेअर, कुष्ठरोग किट आदी साहित्य मोफत देण्यात येणार आहे.

या बैठकीस अध्यक्ष शौमिका महाडिक, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील – पेरीडकर, महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी शिंदे समाजकल्याण अधिकारी डॉ. एस. एच. शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ आदी उपस्थित होते.

342 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे