Breaking News

 

 

गडहिंग्लज बसस्थानकातील पाणपोई दूषित : प्रवाशांच्या आरोग्याला धोका

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज बसस्थानकात असणाऱ्या पाणपोईतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कित्येकवेळा प्रवाशांनी एसटी प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास सांगितले. पण एसटी प्रशासनाचे याकडे कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे.

काही वर्षांपूर्वी गडहिंग्लज बसस्थानकात पाणपोई बांधण्यात आली. कांही दिवस प्रवाशांना स्वच्छ आणि मुबलक  पाणी मिळू लागले. पण त्यानंतर या पाणपोईकडे कोणाचेही लक्ष्य नाही. सध्या कडक्याचा उन्हाळा असून बसस्थानकात आलेले प्रवाशी पाणी पिण्यासाठी पाणपोईकडे धाव घेतात.  आपण पित असलेले पाणी स्वच्छ आहे का, याची खात्री करत नाहीत. त्यामुळे या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

मध्यंतरी पाणीपट्टी न भरल्यामुळे पाण्याचे कनेक्शन बंद करण्यात आले होते. त्यावेळी बाजूला असणाऱ्या रसवंती गृहाच्या मालकाने नळ कनेक्शन स्वतः पैसे भरून स्वतःसाठी  जोडून घेतले. आपल्याला लागते तेवढे पाणी घेऊन उरलेले पाणी टाकीत सोडून देतात. त्यामुळे नळाला कायम पाणी असले तरी टाकीची स्वच्छता केली जात नाही. एक वर्षापूर्वी पाणपोईची स्वच्छता केली आहे. त्यानंतर याकडे एसटी प्रशासनाने कधीच पाहिले नाही.

या पाणपोईमध्ये कचरा आणि आतून कोष्ट्यांच्याघरांनी घेरले आहे. तरी देखील बाहेरून येणाऱ्या प्रवाशाना दुसरा पर्याय नसल्यामुळे आहे त्या टाकीतील पाणी पिऊन आपली तहान  भागवावी लागते. त्यामुळे या पाणपोईची स्वच्छता करून प्रवाशांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल, अशी सोय एसटी प्रशासनाने करावी, अशी मागणी प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे.

777 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग