टोप (प्रतिनिधी) : संभापुर ग्रामपंचायतने २३ ऑक्टोबर पर्यंत शंभर टक्के घरफाळा आणि पाणीपट्टी भरणाऱ्या मिळकतधारकांना मोफत साखरेचे वाटप करून नागरिकांची दिवाळी गोड केली आहे.

संभापूर ग्रामपंचायतचा घरफाळा आणि पाणीपट्टीची वसूली वेळेत व्हावी आणि प्रामाणिकपणे हा कर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सरपंच प्रकाश झीरंगे यांनी आपल्या ग्रा.पं. सदस्य आणि ग्रामसेविकांनी हा विधायक निर्णय घेतला होता. त्यामुळे कर भरणाऱ्या नागरिकांची कर रक्कमेच्या प्रमाणात ५ ते २० किलो पर्यंत मोफत साखरेचे वाटप केले आहे.

घरफाळा रक्कम ५०० ते २ हजार :- ५ किलो साखर, २००१ ते ४ हजार :-१० किलो साखर, ४००१ ते ७ हजार :- १५ किलो साखर, ७ ते १० हजारला २० किलो साखर तर १० हजारच्यांपुढे २५ किलो साखर प्रमाणात नागरिकांना साखर वाटप सुरू आहे. या उपक्रमातुन ग्रामपंचायतीत १२ लाखांहून अधिक वसुली झाली असुन यातुन ६५० पैकी ३०० हून अधिक पात्र लाभार्थी झाले आहेत. याचा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे सरपंच प्रकाश झीरंगे यांनी सांगितले.

यावेळी उपसरपंच धनश्री झीरंगे, सलीम महालदार, संपत कारंडे, रावसो कारंडे, ग्रामसेविका आसमा मुल्लानी आदी उपस्थित होते.