Breaking News

 

 

गडहिंग्लजमध्ये शालेयपोषण संघटनेचे लाक्षणीक उपोषण…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमध्ये आज (गुरूवार) केंद्रीय स्वयंपाकगृह कायदा रद्द करावा, या मागणीसाठी शालेयपोषण संघटनेने प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी प्रांत कार्यालयाला आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.

या निवेदनात म्हंटले आहे की, गडहिंग्लज तालुका आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना ठेकेदार स्वयंपाकी मदतनीस कर्मचारी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून सकस व ताजा पोषण आहार देत आहेत. दरम्यान कोणतीही तक्रार अद्याप कुठेच झाली नाही. पण शासनाने केंद्रीय स्वयंपाकगृह योजना निर्णय घेतला आहे. त्यामुळे मूळ योजनेच्या अंमलबजवणीबाबतच्या आदेशाचा भंग होणार आहे. तसेच घेतलेल्या निर्णयामध्ये पारदर्शकता नाही, आर्थिकदृष्टया सक्षम असणाऱ्या भांडवलदाराना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे महिला मोठ्या प्रमाणात बेरोजगार होणार आहेत.

त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या धोरणाला हरताळ फासून निर्णय निवडणूक आचारसंहीतेचा भंग करून हा आदेश काढला आहे. यावर गांभिर्याने विचार करून केंद्रीय स्वयंपाकगृह योजना रद्द करावी, बिले व मानधन वेळेवर अदा करावे आणि किमान १८,०००/-वेतन द्यावे, अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी बाळेश नाईक, हौसाबाई खवरे, महादेव फुटाणे, राजेंद्र गुंडे, सरीता कोडसकर, दशरथ दळवी, सरोजनी बटकड़ली यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

1,509 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश