Breaking News

 

 

गडहिंग्लजमध्ये शिवसेनेतर्फे पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त बुधवार दि. १ रोजी शिवसेनेतर्फे गडहिंग्लज नगर पालिकेच्या स्वच्छता कामगारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना मिठाई वाटपही करण्यात आले.

संजय संकपाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी आकलाखभाई मुजावर यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. या वेळी शहराध्यक्ष अशोक शिंदे, अमोल नार्वेकर, मनीष हावळ, वसंत शेटके, रमेश कोरवी, अशोक खोत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा