Breaking News

 

 

कोलीकमधील छ. शाहू पुतळा परिसरात सोमवारी स्वच्छता मोहीम : डॉ. जे. के. पवार

बाजारभोगाव (प्रतिनिधी) : कोलीक (ता. पन्हाळा) येथे छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. मात्र या पुतळ्याच्या परिसराची दुरवस्था झाली आहे. यावर ‘लाईव्ह मराठी’ने विशेष व्हिडिओ न्यूजद्वारे लक्ष वेधले होते. या परिसराला अर्थशास्त्राचे अभ्यासक व बालकल्याण समितीचे न्यायाधीश प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी बुधवारी भेट दिली. छ. शाहू महाराजांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच सोमवार दि. ६ रोजी स्वच्छता मोहीम राबवणार असून या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.  

छ. शाहू महाराज यांच्या पुतळा परिसराची अवस्था पाहून पवार यांनी खेद प्रकट केले. ते म्हणाले की, एका महान राजाचा एवढा मोठा पुतळा येथे आहे. आपल्याच जिल्ह्यात अशी लाजिरवाणी गोष्ट घडत असेल तर यासारखे कोणतेही दुर्दैव नाही. या वेळी त्यांनी कोलीकचे पोलीस पाटील संजय पाटील, बाळू पाटील आणि काही ग्रामस्थांशी पुतळ्याचे सुशोभिकरण व संवर्धन करण्यासंदर्भात चर्चा केली.

६ मे रोजी पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल, असे सांगितले. तसेच याच दिवशी सकाळी ८ वा. शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे त्यांनी आवाहन केले. या वेळी प्राचार्य दिग्विजय पवार, प्रा. डॉ. एम. के.कांबळे, प्रा. डी.एच. नाईक, पंकज नाईक व कोलीकचे ग्रामस्थ उपस्थित होते.

789 total views, 9 views today

One thought on “कोलीकमधील छ. शाहू पुतळा परिसरात सोमवारी स्वच्छता मोहीम : डॉ. जे. के. पवार”

  1. पिसात्री गावामध्ये आमच्या नारळीच्या बागेत नारळाच्या ऐकाचा झाडाला दोन फाध्या आहेत. याची नोद घ्यावी. असे झाड सिंधुदुर्ग किल्ल्यावर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे