Breaking News

 

 

गडहिंग्लज युनायटेडच्या चार फुटबॉलपटूंची आयलिग स्पर्धेला निवड…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलच्या चार खेळाडूंची युवा इंडियन फुटबॉल लिग (आय लीग) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रसाद पवार, नुमान मुल्ला, अभिषेक पोवार, गोपी बनगे यांचा यात समावेश आहे. गुजरात बडोदा अकॅडमी (एफए) या संघातून ते राष्ट्रीय युवा आय-लीग स्पर्धेत खेळण्यासाठी रवाना झाले. 

अखिल भारतीय फुटबॉल महासंघातर्फे (एआयएफएफ) युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आय लीग स्पर्धा घेतली जाते. तेरा, चौदा,पंधरा आणि अठरावर्षे वयोगटातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा घेतली जाते.

नुमान मुल्ला व प्रसाद पवार हे साधना हायस्कूल, अभिषेक पवार हा  गडहिंग्लज हायस्कूल तर गोपी बणगे  हा जागृती हायस्कूलचा विद्यार्थी आहे. त्यांना प्रशिक्षक दीपक कुपनावर, सहाय्यक यासीन नदाफ यांचे मार्गदर्शन मिळाले. गडहिंग्लज युनायटेड  फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराव शिवारे, उपाध्यक्ष अरविंद बारदेसकर आणि सर्व संचालकांचे त्यांना प्रोत्साहन मिळाले.

युवा आयलीग स्पर्धेसाठी गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलच्या  बंगळूर युथ लिग (बीवायएफएल) संघातून गेल्याच आठवड्यात  आदित्य रेंदाळे, रितेश बदामे यांची निवड झाली. गोव्यातील साई प्रशिक्षण केंद्रात सिद्धार्थ दड्डीकर निवडला गेला. बडोदा संघातून चार खेळाडू आयलीग स्पर्धा खेळणार आहेत. त्यामुळे गडहिंग्लजच्या प्रतिभावान खेळाडूंना मागणी वाढली आहे.

657 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे