Breaking News

 

 

जिल्हा परिषदेमध्ये पाणीटंचाईवर फक्त चर्चाच…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील एकूण १०९ गावे व १९८ वाड्यांवर संभाव्य पाणीटंचाई आहे. यासाठी आज (मंगळवार) जिल्हा परिषदेत गटविकास अधिकारी तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र पाणी टंचाईवर फक्त चर्चाच झाली, असेच म्हणावे लागेल. फक्त ११ गावांमध्येच पाणी टंचाई असल्याचा अहवाल या बैठकीत सादर करण्यात आला. मात्र जिल्ह्यातील अनेक गावे आणि वाड्यांवस्त्यांवर पाणीटंचाईचे असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील इब्राहीमपूरपैकी धनगरवाडा, कोदाळेपैकी बांदरे, निरवेलपैकी नामखोल, राधानगरमधील ठिकपुर्लीपैकी धनगरवाडी, माजगावपैकी कुराडवाडी, ठिकपुर्लीपैकी भैरी, मासुर्लीपैकी अस्वलवाडी, शाहूवाडीमधील उखळूपैकी सोनारवाडी, बुराणवाडी या गावांमध्ये पाणीटंचाई असल्याचा अहवाल देण्यात आला.

पाणी टंचाई संदर्भात पाहणी करण्यात आली असून प्रत्यक्षात  काम सुरु आहे. सदर अकरा गावांमध्ये कृत्रिम पद्धतीच्या टाक्या बसवण्यात येणार आहेत. पाणी टंचाईवर विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार असून जि.प.च्या स्वनिधीतून योजना करण्यात येणार आहे, असे जि.प.अध्यक्ष शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल तसेच कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा मनिष पवार यांनी सांगितले.

249 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे