Breaking News

 

 

माध्यमिक शिक्षणाधिकारी लोहार यांना कार्यमुक्त करण्याची चौकशी समितीची शिफारस

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आपल्या कामात कसूर केली आहे. त्यांनी दप्तरदिरंगाई, शासकीय नियमांचे उल्लंघन केले असल्याचा ठपका ठेवत त्यांना सेवेतून कार्यमुक्त करावे अशी शिफारस चौकशी समितीने अहवालात केली आहे. आज (मंगळवार) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत हा अहवाल सादर करण्यात आला.

समितीने या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, किरण लोहार हे हेतूपुरस्सर जिल्हा परिषदेने बोललेल्या सभेस अनुपस्थित राहतात असे निदर्शनास आले आहे. लोहार यांच्याबाबत अनेक सदस्यांनी तक्रारी केल्या होत्या.

दरम्यानच्या काळात सर्वसाधारण सभेत त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी असा ठराव करण्यात आला. त्यानंतर एक चौकशी समिती नेमली. सहा महिन्यांनंतर चौकशी समितीने आज अहवाल सादर केला. सदर अहवाल १५ जूननंतर शिक्षण खात्याकडे पाठविण्यात येणार आहे असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सांगितले.

शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांची अध्यक्षतेखालील या चौकशी समितीमध्ये ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले, भगवान पाटील, प्रसाद खोबरे, तसेच समिती सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांचा समावेश होता. शिक्षण विभागातील इतर कर्मचाऱ्यांच्याही बदल्या करण्यात याव्यात असेही या अहवालात म्हटले आहे. जिल्हा परिषदेमध्ये लोहार यांच्या कारभाराचा विषय चांगलाच गाजला होता.

543 total views, 18 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग