मोदी निर्लज्ज पंतप्रधान : ममता बॅनर्जींंची आगपाखड

0 1

कोलकाता (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार फुटतील,  असे भाकित जाहीर सभेत वर्तवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ममता बॅनर्जी यांनी अपेक्षेप्रमाणे आगपाखड केली आहे. मोदी हे निर्लज्ज पंतप्रधान असून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी जेणेकरून निवडणुकीच्यावेळी घोडेबाजार होणार नाही, असे ममतांनी म्हटले आहे. त्या आज (मंगळवार) हुगळी जिल्ह्यातील प्रचारसभेत बोलत होत्या. 

पश्चिम बंगालच्या श्रीरामपूर येथे काल (सोमवार) नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. यावेळी त्यांनी २३ मे रोजी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर ममतांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

ममता यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य घटनाविरोधी असून ते घोडेबाजाराला प्रोत्साहन देत आहेत. ते निर्लज्ज पंतप्रधान आहेत. तृणमूल काँग्रेस भाजपप्रमाणे नाही. भाजपमध्ये चोरांचा भरणा असून ते केवळ पैशासाठी काम करतात. तर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते त्यागी वृत्तीने काम करतात. जर एका नेत्याने पक्ष सोडला तर मी लाखो नवे कार्यकर्ते उभे करेन. परंतु, मोदी घटनात्मक पदावर राहून संविधानविरोधी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदी राहण्याचा हक्क नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More