Breaking News

 

 

विदर्भात हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’

नागपूर (प्रतिनिधी) : राज्यात सध्या तापमान वाढल्याने लोक हैराण झाले आहेत. पुढील दोन दिवस विदर्भात तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याने अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या ६ जिल्ह्यांकरिता हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

एखाद्या ठिकाणचे तापमान सतत दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी ४७ अंश सेल्सियसवर कायम असेल तर त्या ठिकाणी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात येतो. ‘रेड अलर्ट’चा इशारा हवामान खात्याने दिल्यावर स्थानिक प्रशासनाने त्या अनुषंगाने खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक असतात. उष्माघातापासून बचावासाठी मे महिन्यात शासकीय, अशासकीय, खासगी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

अतिरिक्त वर्ग किंवा परीक्षा घेण्याची आवश्यकता असल्यास सकाळच्या सत्रात सकाळी ११ वाजेपर्यंतच शाळा व महाविद्यालये सुरु ठेवावीत असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.

बंगालच्या खाडीवर चक्रीवादळ तयार झाल्याने हवेत आर्द्र्ता येईल आणि तापमान कमी होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे, अशी माहिती नागपूर प्रादेशिक वेधशाळेचे उपमहानिरीक्षक एम. एल. साहू यांनी दिली.

150 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे