Breaking News

 

 

पावसच्या खाडीकिनारी मृत माशांचा खच

रत्नागिरी (प्रतिनिधी) : पावस येथील भाटीवाडी खाडी किनारी आज (मंगळवार) शेकडो मृत मासे सापडले. खाडी किनारी मोठ्या प्रमाणात शैवाळयुक्त हिरवे पाणी दिसत असून अनेक लहान-मोठ्या आकाराचे मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत. किनारपट्टीवर मृतावस्थेत मासे सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली.

मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त आनंद पालव यांनी सांगितले की, सध्या समुद्र भरतीच्या काळात पाणी पावस भाटीवाडी किनाऱ्यापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे तेथील पाण्यातील ऑक्सिजन कमी झाला आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी झाल्यामुळे मासे मृत पावले असल्याचे पालव यांनी सांगितले.

पावस भाटीवाडी किनाऱ्यावरील पाण्याचे नमुने तपासणीसाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आले आहेत.

126 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा