Breaking News

 

 

मोदींची उमेदवारी रद्द करा : तृणमूल काँग्रेसची मागणी

कोलकता (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करुन आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. खोटा दावा करुन त्यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असून त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (सोमवार) तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करून खळबळ उडवली आहे. ममतादीदी, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तुमचे आमदारही तुम्हाला सोडून जातील. सध्या तुमचे ४० आमदार माझ्या संपर्कात आहेत, पण भाजपा निवडणूक जिंकण्याचा अवकाश तुमचे सर्व आमदार तुम्हाला सोडून येतील. तुमच्या पायाखालचे राजकीय मैदान सरकू लागले आहे, असा टोला मोदींनी लगावला होता. त्यामुळे तृणमूल काँग्रेस आक्रमक झाली आहे.

काल (सोमवारी) संध्याकाळी तृणमूलने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की, मोदींनी खोटे दावे करुन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणीही तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात केली आहे.

426 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा