Breaking News

 

 

ऋषी कपूरची दुर्धर आजाराशी झुंज यशस्वी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर मागील अनेक महिन्यांपासून कर्करोगावर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होते. आता मात्र त्यांनी या जीवघेण्या आजारावर मात केली आहे. ऋषी कपूर यांचा मित्र राहुल रवैल यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून ही बातमी कळवली आहे.

गेल्या वर्षी अनेक बॉलिवूड कलाकार कॅन्सरच्या विळख्यात अडकल्याचे उघडकीस आलं होतं. त्यापैंकीच एक ऋषी कपूरही होते. इरफान खान, सोनाली बेंद्रे यांनाही कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं. परंतु, आता या दोन्हीही कलाकारांनी कॅन्सरवर मात केल्याचं पाहायला मिळत आहे.

ऋषी कपूर गेल्या वर्षी ‘१०२ नॉट आऊट, मुल्क’ या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. कर्करोग झाल्याचं समजल्यानंतर त्यांची पत्नी नीतू कपूर आणि मुलगा रणबीर कपूर त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले होते. त्यामुळे त्यांनी ही झुंज यशस्वी पार केली आहे.

522 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग