Breaking News

 

 

गडहिंग्लजमध्ये शिक्षकांची प्रांत कार्यालयासमोर निदर्शने

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीवेळी सेवा बजावलेल्या शिक्षकांना भत्त्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. याच्या निषेधार्थ गडहिंग्लजमध्ये शिक्षकांनी प्रांत कार्यालयासमोर आज (मंगळवार) दुपारी एकच्या सुमारास निदर्शने केली. या वेळी शिक्षकांनी प्रांताधिकारी विजया पांगारकर आणि पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांचा निषेध केला.

प्रत्येक निवडणुकीत शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे शिक्षकांना सन्मानाची वागणूक मिळणे अशक्य आहे. भविष्यात अशा गोष्टींना आळा बसावा म्हणून आज निदर्शने करीत, असल्याचे बाळेश नाईक, पी. डी. पाटील, आशपाक मकानदार, दत्ता देशपांडे, शिवाजीराव होडगे, अविनाश कुलकर्णी यांनी भाषणात सांगितले.

मुख्याध्यापक संघ, शैक्षणिक व्यासपीठ, माध्य. शिक्षक संघ, कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना तसेच विविध राजकीय सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash