Breaking News

 

 

नेस वाडियाला ‘ड्रग्ज’प्रकरणी दोन वर्षांचा कारावास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिचा माजी प्रियकर नेस वाडिया यांना ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जपानमध्ये स्किईंगच्या सुट्टी दरम्यान ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी दोषी आढळल्यानंतर जपानी न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

जपानी मिडीयाने दिलेल्या माहितीनुसार, न्यू चिटोजच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान नेस वाडिया यांच्याकडून २५ ग्रॅम नशायुक्त पदार्थ जप्त केले होते. मार्चमध्ये उत्तर जपानी बेट होक्काइडो के न्यू चिटोज विमानतळावर त्यांना अटक करण्यात आली होती.

नेस वाडिया हे २८३ वर्ष जुन्या वाडिया समूहाचे वारस आहेत. ४७ वर्षीय नेस वाडिया हे भारताचे प्रसिद्ध उद्योगपती नुस्ली वाडिया यांचे पुत्र आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब क्रिकेट टीमचे ते मालक आहेत. नेस वाडिया हे सात अब्ज किंमतीच्या संपत्तीचे मालक आहेत. वाडिया समूहात बिस्कीट कंपनी ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’पासून विमान कंपनी ‘गोएअर’ अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे.

222 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे