कागल (प्रतिनिधी) : कागलमधील रमाई आवास योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे अनुदान मंजूर होऊन केवळ राजकीय अनास्थेपोटी बऱ्याच वर्षांपासून पासून रखडले होते. या योजनेतील लाभार्थ्यांनी शासकीय कार्यालयामध्ये अनेक हेलपाटे घालून कोणीही त्यांची दखल घेतली नव्हती. यामध्ये राजे समरजीतसिंह घाटगे यांनी या कामात लक्ष घातले आणि हे रखडलेले अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट वर्ग होण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. याबद्दल लाभार्थी रंजना सोनुले, विवेक सोनुले, अविनाश कांबळे, अरूण लोखंडे, विशाल आवळे, विजय धस्ते यांनी कुटुंबीयांसमवेत समरजितसिंह घाटगे यांचे आभार मानले.

यावेळी लाभार्थी विशाल आवळे यांनी, राजेसाहेबांच्या प्रयत्नामुळे आमच्या खात्यावर पैसे वर्ग करून अनेक वर्षे रखडलेले आमच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण  करून सत्यात उतरवले आहे. आता आमची एकच विनंती आहे की, आमच्या वास्तुशांतीसाठी आपण सहकुटुंब यावे असे आग्रहाचे निमंत्रण घाटगे यांना दिले.

यावेळी राजे बँकेचे संचालक उमेश सावंत, बाळू हेगडे, संजय सोनुले, गजानन माने, विजय सोनुले, विक्रम गाडेकर यांच्यासह लाभार्थी कुटुंबीय,  कार्यकर्ते उपस्थित होते.