Breaking News

 

 

दहशतवादी यासिन भटकळ विरोधात आरोप निश्चित…

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी यासिन भटकळ विरोधात आज (सोमवार) आरोप निश्चित करण्यात आले आहे. आरोप निश्चितीसाठी भटकळला न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी दिले होते. त्यानुसार त्याला पुण्याच्या न्यायालयात हजर करण्यात आले आहे. 

भटकळवर देशभरातील विविध दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी गुन्हे दाखल असून ठिकठिकाणच्या न्यायालयात त्यासंदर्भातील खटले सुरू आहेत. तो सध्या तिहार जेलमध्ये आहे. जर्मन बेकरी खटल्याचं दोषारापपत्र २०१४ मध्येच दाखल झाला मात्र सुनावणी सुरू झाली नव्हती. जर्मन बेकरी प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याची पुढील सुनावणी १५ जूनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. 

फेब्रुवारी २०१० मध्ये पुण्यात झालेल्या कोरेगाव पार्क भागातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात १७ जण ठार झाले होते तर जवळपास ६४ जण गंभीर जखमी झाले होते. उज्ज्वल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भटकळ विरोधात आयपीसीच्या स्फोटकं अधिनियम आणि बेकायदेशीर कृत्यं अधिनियमाच्या वेगवेगळ्या कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले आहेत. याआधी, २०१३ च्या हैदराबाद दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयानं भटकळला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे.

225 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *