Breaking News

 

 

कोल्हापुरात डान्स असोसिएशनतर्फे ज्येष्ठ नृत्यकर्मींना आदरांजली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर डान्स असोसिएशनच्या वतीने जागतिक नृत्यदिन आज (सोमवार) पार पडला. सकाळी १०.३० वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे जमले. नृत्यकर्मी, नृत्यदिग्दर्शक, नृत्यकलाकार एकत्र आले. आणी नृत्यासाठी झटलेल्या जेष्ठ नृत्यकर्मी कै. पं.बद्रीनाथ कुलकर्णी, कै. गणपत पाटील, कै.प्रकाश हिलगे यांच्या  छायाचित्रांचे भव्य फलकाचे अनावरण अँथोनी डिसोजा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पं.बद्रीनाथ कुलकर्णी यांच्या आठवणी  त्यांच्या वारसदार रमा कुलकर्णी व मोहिणी दिवाण यांनी सांगितल्या. प्रकाश हिलगे यांच्या वारसदार प्रिन्स रियाज खलिफा यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर  कै. गणपत पाटील यांच्या विषयी मनोगत  सागर बगाडे यांनी व्यक्त केले.

चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशनच्या वतीने असोसिएशनच्या गरजु नृत्यकलाकारांसाठी ११,०००/ रूपयांचा धनादेश फौंडेशनच्या उपाध्यक्षा सपना जाधव यांनी असोसिएशनकडे सुपुर्द केला. संस्थेचे संचालक  संदिप मचले यांनी पुढील उपक्रमाविषयी अवाहन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष संग्राम भालकर यांनी केले

यावेळी नृत्यकर्मी, नृत्यदिग्दर्शक, नृत्यकलाकार उपस्थित होते.

639 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश