Breaking News

 

 

भाजपमध्ये येणार तृणमूल काँग्रेसचे ‘४०’ आमदार : नरेंद्र मोदी

श्रीरामपूर (वृत्तसंस्था) :  २३ मे दिवशी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार भाजपमध्ये येणार आहेत, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जींना दिला आहे. ते पश्चिम बंगालमधल्या श्रीरामपूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये अजून मतदानाचे टप्पे बाकी आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये सभा घेत आहेत.

मोदी म्हणाले, नव्या भारताच्या निर्मितीसाठी पश्चिम बंगालची जनता ऐतिहासिक मतदान करते आहे. असे म्हणत मोदींनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला. ममता बॅनर्जी या केंद्र सरकारच्या योजनेवर स्वत:चे स्टीकर लावतात. केंद्र सरकारने मुलींच्या संरक्षणासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. पण येथील सरकार राज्यात ती व्यवस्थित लागू करत नाही. असा टोलाही पंतप्रधान मोदींनी लगावला.  

396 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *