Breaking News

 

 

…आणि वृध्द महिला गहिवरून म्हणाल्या ‘आमदार असावा तर मुश्रीफांंसारखा !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हसूर खुर्द (ता. कागल) येथे आज (सोमवार) एका विवाह समारंभाला उपस्थित राहण्यासात्ठी आ. हसन मुश्रीफ जात होते. इथला परिसर हा डोंगर भागाचा आहे. त्यातच दुपारच्या रखरखीत उन्हात आ. मुश्रीफ जात असताना त्यांना रस्त्यावरुन जाणाऱ्या दोन वयोवृद्ध महिला आणि पुरुष दिसले.

मुश्रीफांनी गाडी थांबवून या महिलांना विचारताच त्यांनी आपण लग्नासाठी जात असल्याचे सांगितले. आ. मुश्रीफांनी त्यांना आपल्या गाडीतून येण्याची विनंती केली. गिजाबाई पाटील, यशोदा पाटील आणि तुकाराम पाटील यांना आ. मुश्रीफांनी आपल्या गाडीत बसून हसूर खुर्द येथे लग्नाच्या ठिकाणी पोहोचवले. यावेळी लग्नाच्या ठिकाणी उपस्थित लोकांनी आश्चर्य व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तर रणरणत्या उन्हातून जाणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांना आपल्या गाडीत बसवणारा मुश्रीफ साहेबांसारखा आमदार पाहिला नसल्याची प्रतिक्रिया या महिलांनी सद्गदित स्वरात व्यक्त केली.

1,749 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे