Breaking News

 

 

नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघनाची याचिका दाखल…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसच्या महिला शाखेच्या अध्यक्ष खा. सुष्मिता देव यांनी आचारसंहिता उल्लंघनाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणीही सुष्मिता देव यांनी केली आहे. या याचिकेवर उद्या (मंगळवार) सुनावणी होणार आहे.

याचिकेत म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी अनेकवेळा निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे पुरावे काँग्रेस पक्षाने दिले आहेत. हे दोन्ही नेते भडक भाषणे करतात आणि आपल्या भाषणांमधून देशाच्या सैन्याच्या नावाने मत मागतात. निवडणूक आयोगाने अशा प्रकारच्या सर्व कृत्यांवर प्रतिबंध लावला आहे. 

२३ एप्रिलला मोदींनी अहमदाबादेत मतदान केल्यानंतर भाजपची रॅली निघाली. ही देखील आचारसंहितेच्या विरोधातील कृती होती. याची रितसर तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. पण अद्याप निवडणूक आयोगाने या दोघांवर कारवाई केलेली नाही, असे सुष्मिता देव यांचे म्हणणे आहे. 

330 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे