Breaking News

 

 

बॉलिवूडचे महानायक साकारणार तृतीयपंथीची भूमिका

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडचे महानायक ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आता ते आव्हानात्मक व्यक्तीरेखा करणार आहेत. अमिताभ बच्चन एका चित्रपटात तृतीयपंथीची भूमिका साकारणार आहेत.

थ्रिलर विनोदी चित्रपटात बच्चन तृतीयपंथीची भूमिका करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिग बी आता तेलगू सुपरहिट ‘कंचना’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहेत. चित्रपटात मुख्य भूमिका अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी साकारणार आहे.  

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी भूमिकेबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. ‘कंचना’ चित्रपटायाच्या हिंदी रिमेकचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवण्यात आले आहे.

390 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा