Breaking News

 

 

कोल्हापूर मुख्याध्यापक संघ राज्यात उपक्रमशील : सुरेश आवारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  राज्यातील उपक्रमशील आणि कार्यक्षम मुख्याध्यापक संघ म्हणून कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचा उल्लेख करावा लागेल, असे उद्गार कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक सुरेश माधव आवारी यांनी काढले. ते डी.सी.नरके विद्यानिकेतन, कुडित्रे (ता. करवीर) येथे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादा लाड होते.  यावेळी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वार्षिक कृतिसत्रात आदर्श शिक्षण संस्था, उपक्रमशील शाळा व गुणवंत सेवकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

आवारी म्हणाले, माझ्या २६ वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दीत विविध जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली. पण  मुख्याध्यापकांसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा गौरव करणारा कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आदर्शवत आहे. संघाचे विविध उपक्रम शाळा, शिक्षकांना मार्गदर्शक ठरले असल्याचे सांगितले.

यावेळी जीवन साळोखे यांच्या ‘ध्यास अभ्यासाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी एस.एस.सी.बोर्डाचे सहसचिव टी.एल.मोळे, न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, जीवन साळोखे, श्रीशैल्य मठपती, शिवाजी चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली.

आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर या संस्थेस, उपक्रमशील शाळा पुरस्कार जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर या शाळेस तर गुणवंत मुख्याध्यापक शिवाजी चव्हाण (करवीर), एस. एन. कुलकर्णी (कागल), ए. एस. पाटील (चंदगड), शरद सावंत (गगनबावडा) तर गुणवंत शिक्षक पुरस्कार भाऊसाहेब कराळे (शाहूवाडी), जयसिंग कारंडे (हातकणंगले), आप्पासाहेब दिवटे (आजरा), आर.डी.पिष्टे (इचलकरंजी), सत्याप्पा हजारे  (पन्हाळा), गुणवंत लिपिक पुरस्कार चंद्रकांत लाड (राधानगरी), राजेंद्र साळोखे (भुदरगड), विश्वास रेडेकर (गडहिंग्लज) व आदर्श कर्मचारी पुरस्कार सुखदेव कांबळे (कोल्हापूर शहर) यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी माध्यमिक शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, नितीन वाडीकर, बापूसाहेब शिंदे, डी.बी.पिष्टे संघाचे उपाध्यक्ष बी.आर.बुगडे, एस.एम.पसाले, प्रकाश पोवार, एम. के.आळवेकर, एस.वाय.पाटील, इरफान अन्सारी, अजित रणदिवे, पी.व्ही.पाटील, श्रीकांत पाटील, सखाराम चौकेकर, रवींद्र मोरे, बबन इंदूलकर, संजय भांदुगरे, संजय देवेकर, गुलाब पाटील, सौ.अनिता नवाळे, दीपक पाटील, बी.डी.खडके प्रमुख उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक सुरेश संकपाळ यांनी केले. तर आभार प्रा. मिलिंद पांगिरेकर  यांनी मानले.

414 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा