Breaking News

 

 

बीसीसीआयने केला आयपीएलच्या वेळेत बदल

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलचे प्ले ऑफ व फायनल सामन्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय बीसीसीआयने आज (सोमवार) घेतला.आधीच्या वेळापत्रकानुसार हे सामने रात्री ८ वाजता होणार होते. ते आता सायंकाळी ७:३० वाजता होतील. प्ले ऑफ सोबतच अंतिम सामना अर्धा तास आधी होणार आहे. तसेच, ७ ते १२ मे दरम्यान सामने होणार आहेत. 

यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथमच महिलांच्या मिनी ट्वेंटी-२० लीगचे आयोजन करण्यात येणार आहेत. तीन संघांचा समावेश असलेल्या या लीगचे सामने ९ ते ११ मे दरम्यान जयपूरमध्ये होणार आहेत. हे सामने सायंकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येतील. मात्र या लीगचा ८ मे रोजी होणारा दुसरा सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल.

816 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा