Breaking News

 

 

कोल्हापुरात आबालवृद्धांच्या करमणुकीसाठी ‘सुपरस्टार सर्कस’ सुरू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उन्हाळी सुट्टीचे औचित्य साधून आबालवृद्धांच्या करमणुकीसाठी कोल्हापुरातील आयर्विन ख्रिश्चन मैदानावर ‘सुपरस्टार सर्कस’ आजपासून (सोमवार) सुरु झाली आहे. या सर्कसमध्ये ११० कलाकारांचे कसरतीचे प्रयोग व इतर करमणुकीचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती सर्कसचे मालक प्रकाश माने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील माडग्याळचे रहिवासी असणाऱ्या प्रकाश माने यांनी मोठ्या धाडसाने ही सुपरस्टार सर्कस उभारली आहे. या सर्कसमध्ये आसाम, पश्चिम बंगाल, दार्जिलिंग, कर्नाटक, महाराष्ट्रासह ११० कलाकारांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये ५० महिला कलाकार सहभागी आहेत. हे कलाकार झोक्याचे खेळ, प्लास्टिक बोलनेस, तारेवरची कसरत, डबल बोलनेस, बारा फूट उंचीची एक चाकी सायकल, आक्रोपॅट सायकल,  मृत्युगोलमध्ये दोन वाहनांची कसरत हे खेळ होणार आहेत. याशिवाय पाच ते सहा विदूषकांचा यामध्ये समावेश आहे.

केवळ २४ इंच उंची असलेला जगातील सर्वांत बुटका विदूषक असलेला शैलेश नाईक आणि चिंपांझीसारखा माणूस हे या सर्कशीचे मुख्य आकर्षण आहे. या सर्कशीचे रोज ३ खेळ होणार आहेत, असेही माने यांनी सांगितले.

1,776 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग