Breaking News

 

 

क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीला अटक

मुंबई (प्रतिनिधी) : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांची पत्नी हसीन जहाँ हिला अमरोहा पोलिसांनी काल (रविवारी) रात्री अटक केली. मोहम्मद शमीच्या घरात घुसून त्याच्या आईशी वादावादी केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मोहमद्द शमीची पत्नी हसीन जहाँ मुलीसह सासरी सहसपूर अलीनगरला घरी पोहचली. हसीन घरी पोहचताच सासू आणि दीर यांच्यासोबत तिचे शाब्दिक भांडण झाले. यानंतर शमीच्या आईनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. तसेच जबरदस्तीने घरात घुसून मला घराबाहेर काढल्याचा आरोप हसीनवर केला. पोलिसांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. वाद मिटण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे पोलिसांनी तेथून हसीनला घेऊन गेले. सध्या हसीन जहाँवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

1,908 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग