Breaking News

 

 

उंदरवाडी विद्या मंदिर शाळेची प्रगती सर्वांसाठी प्रेरणादायी : जी.बी.कमळकर

मुधाळतिट्टा (प्रतिनिधी) :  उंदरवाडी गटशिक्षणाधिकारी डॉ.जी.बी.कमळकर यांनी विद्या मंदिर, उंदरवाडी शाळेची प्रगती सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार यांनी काढले. ते शाळेचे मुख्याध्यापक आर.जी.निंबाळकर यांच्या सेवानिवृत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

डॉ.कमळकर म्हणाले, शाळेने ५ लाखांच्या आर्थिक तर दोन लाखांपर्यंत वस्तू रुपाने केलेल्या शैक्षणिक उठावातून शाळेचे रूप पालटले आहे. शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक मंच यांच्या सहकार्यातून एक आदर्श शाळा निर्माण केली आहे. शैक्षणिक स्पर्धा परिक्षांबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांमध्येही शाळेने यश संपादन केले आहे. तसेच भविष्यात शाळेसाठी लागेल ते सहकार्य करण्याचे त्यांनी अभिवचन दिले.

मारूती पाटील, मंडलिक कारखाना संचालक मसू पाटील, जिल्हा समन्वयक बाबूराव पाटील, केंद्र प्रमुख माळवी, एस.के.पाटील, बँक संचालिका लक्ष्मी पाटील, रमेश कोळी, तोरस्कर, मुख्याध्यापक आर. जी. निंबाळकर यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी शाळा समिती अध्यक्ष सात्तापा पाटील, सर्व शाळा समिती सदस्य, डे सरपंच चंद्रकांत पाटील, मारुती पाटील, एस.व्ही.पाटील, पी.एल.पाटील, आर.एस.पाटील, सुकुमार पाटील, एस.एस.पाटील, शिक्षण मंच सदस्य उपस्थित होते.

411 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा