पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पुनाळ येथील केंद्रीय शंकरराव चव्हाण विद्या मंदिर पुनाळ या शाळेस शिव-काशि फौंडेशन पुनाळ. संस्थापक अध्यक्ष सुरेश वडर व सर्व पदाधिकारी यांच्या कडुन वाचन प्रेरणा दिनाचे अवचित्य साधुन विविध वाचनीय पुस्तके भेट मुख्याध्यापक तानाजी घरपणकर व शिक्षक स्टाप यांच्याकडे दिले असून.

जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार तानाजी घरपणकर यांचा सत्कार शिव-काशि फौंडेशनच्या वतीने केला.यावेळी घरपणकर म्हणाले की, ग्रंथ वाचनाने मानवी बुद्धीला चालना मिळुन सृजनात्मक विचार, कृती येतात. संघर्ष बहुजन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणाले की, जीवन समृद्धीसाठी वाचन करावे. यावेळी शालेय वेवस्थापनचे उपाअध्यक्ष संभाजी पवार, पंडीत पाटील, लिलादर अमरापुरकर, अरुन पोवार, युवराज पोवार, दिपक पोवार, अमोल हेगडे, मनोज राणभरे, फल्लवी राणभरे, कुजन सातपुते, कुंभार सर यासह आदी उपस्थित होते.