Breaking News

 

 

कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने एस.आर.माने यांचा सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा माहिती अधिकारी एस.आर.माने यांचा सेवानिवृत्त्ती निमित्त
कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने आज (सोमवार) सत्कार करण्यात आला.

एस.आर.माने यांनी राज्यातील जिल्हा माहिती कार्यालयात गेली ३५ वर्ष कार्यभार सांभाळला. शासकीय अधिकारी म्हणून आतापर्यंत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी सर्वाची मने जिकली आहेत. सर्वांना सहकार्य करण्याच्या भूमिकेमधून त्यांनी पत्रकारांना परिपूर्ण बातम्या दिल्या आहेत. यापुढेही त्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांच्या संपर्कात राहून शासकीय यंत्रणेतील आवश्यक ती माहिती देत राहतील. त्याचा उपयोग वृत्तपत्रात काम करणाऱ्या सर्व पत्रकारांना होईल. अशी प्रतिक्रिया काही उपस्थित पत्रकारांनी यावेळी दिली.   एस.आर.माने यानी सत्काराला उत्तर देताना, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार यासह कार्यालयातील सहकारी यांनी सहकार्य केल्यामुळे सेवाकाळात चांगले काम करु शकलो, अशा भावना व्यक्त केल्या.

यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, समीर मुजावर, उदय कुलकर्णी, बाळासाहेब माने, प्रेस क्लबचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.  

600 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा