दिल्ली (वृतसंस्था) : ऐन सणासुदीच्या काळात आता सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसणार आहे. अमुलने दिल्लीत पुन्हा एकदा दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. दिल्लीत एक लिटर फुल क्रीम दुधाची किंमत ६३ रुपये प्रति लिटर झाली असून. या अगोदर ऑगस्टमध्ये दुधाच्या दरात वाढ झाली होती. काल जाहीर झालेल्या महागाईच्या आकडेवारीनुसार, पशुखाद्याचा महागाई दर ९ वर्षांच्या २५ टक्क्यांहून अधिक विक्रमी पातळीच्या जवळपास राहिला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.

अमूलने वाढत्या खर्चाचे कारण देत किंमती वाढवत असल्याचे म्हटले आहे. जनावरांच्या चाऱ्याची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे दुधाच्या दारात वाढ होत आहे. सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर २५.२३ टक्के राहिला आहे. जो गेल्या वर्षी याच महिन्यात २०.५० पके होता. ऑगस्ट महिन्यात जनावरांच्या चाऱ्याचा दर २५५४ पोहोचला होता, तो ९ वर्षातील उच्चांक होता. या अदगोरही दुधाच्या दरात वाढ झाली होती. यावेळी राज्यातील गोकुळ तसेच अन्य डेअरींनीही दरात वाढ केली होती. आता पुन्हा ऐन सणांच्या काळात दुधाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.