Breaking News

 

 

आर.बी.स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या ४६ खेळाड़ूंची भारतीय संघात निवड…

गारगोटी (प्रतिनिधी) : टॅलेंट सर्च फेडरेशन नेपाळ, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉमेट नेपाल ऑलिम्पिक असोसिएशनने आयोजित केलेल्या इंडिया-नेपाल इंटरनॅशनल गेम्समध्ये आर.बी. स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या ४६ खेळाड़ूंची  भारतीय संघात निवड झाली आहे.

त्यामध्ये कोल्हापुरातील सिद्धान्त ओझा (स्केटिंग), धैर्य ढले (स्केटिंग), केदार कांबळे (कुस्ती), मोहम्मद फैज़ (कबड्डी), सूरज शेरेकर (कबड्डी), विद्यासागर महाजन (ताइक्वाँदो), नियम सवाळे (ताइक्वाँदो), संदेश भोजकर (गोळाफेक), वैभव माळी (बॉक्सिंग), भारत आसबे (रनींग) या दहा खेळाडूंचा समावेश आहे

या खेळाडूंना आर.बी.स्पोर्ट्स मँनेजमेंटच्या अध्यक्षा सौ. सरताज काजी, उपाध्यक्ष साहिल बेगुलजी यांचे मार्गदर्शन लाभले. तर राज्य क्रीड़ा परिषदचे सचिव निहाल बेगुलजी यांचे विशेष सहकार्य लाभले. खेळाडूंना क्रीडा शिक्षक निलेश परिट,प्रकाश निराळे, इमरान चाउस यांचे मार्गदर्शन मिळाले.

579 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे