कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या ५६ विद्यार्थ्याची  ‘व्होडाफोन इंटेलिजन्ट सोल्युशन्स’ या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली असून, त्यांना कंपनीने वार्षिक ५ लाखांचे सॅलरी पॅकेज मिळाले आहे. महाविद्यालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात पूजा ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

‘व्होडाफोन इंटेलिजन्ट सोल्युशन्स’ या आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अंतिम वर्षाच्या ५६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये आपल्या कामाने हे विद्यार्थी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ठसा उमटवतील असा विश्वास पूजा पाटील यांनी व्यक्त केला. त्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता म्हणाले, विविध कल चाचण्या, माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, विविध कंपन्यांच्या मनुष्यबळ विभागाच्या अधिकाऱ्याबरोबर चर्चासत्रे घेण्यात आली. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सुदर्शन सुतार यांनी सांगितले की, या वर्षभरात २५० हून अधिक कंपनी प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी झाल्या आहे. विविध काठिण्य पातळीच्या चाचण्या आणि मुलाखतीद्वारे ‘व्होडाफोन इंटेलिजन्ट सोल्युशन्स’ द्वारे ही निवड करण्यात आली आहे.  प्राचार्य डॉ . संतोष चेडे यांनी मनोगत व्यक्त केले.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व आ. सतेज पाटील, विश्वस्त व आ.  ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे,  रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, प्रा. सुदर्शन सुतार, हेड ट्रेनिंग प्रा. मकरंद काईंगडे, प्रा. मनीषा भानुसे आदींनी अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांचे यश अत्यंत कौतुकास्पद

महाविद्यालयाच्या ५६ विद्यार्थ्यांची ‘व्होडफोन’मध्ये झालेली निवड कौतुकास्पद आहे. इंडस्ट्रीच्या गरजा व संधी लक्षात घेऊन ‘रेडी टू प्लेस’ विद्यार्थी तयार करण्यासाठी आमचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग मेहनत घेतो. व्यक्तिमत्त्व विकास, सॉफ्ट स्किल्स, कोडिंग प्रशिक्षण याचा चांगला फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. त्यामुळेच एका वर्षात ८०० हून अधिक  विद्यार्थ्यांना उत्तम प्लेसमेंट देण्यात महाविद्यालय यशस्वी ठरले.

– पूजा ऋतुराज पाटील