गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यात पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीचा पाऊस सुरू झाल्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाला चांगलाच फटका बसला आहे. सोयाबीन पीक हातचे जाण्याच्या भीतीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

यासंदर्भात बोलताना शेतकरी तेलवेकर यांनी सांगितले की, शेतीची पेरणी आणि मशागतीचा खर्च जास्त आणि पीक कमी अशी स्थिती झाली आहे. पिकासाठी घेतलेली मेहनत या पावसामुळे वाया गेली. पावसामुळे सोयाबीनवर डाग पडतात आणि त्याला किंमत कमी मिळते. हंगाम संपत आला असला तरी अजूनही दुबार पेरणी किंवा उशिरा पेरणी केल्यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणात पीक शेतातच आहे.