Breaking News

 

 

जामनेरमध्ये पाण्यात विष टाकून वन्यप्राण्यांना मारले…

भुसावळ (प्रतिनिधी) : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनाळा येथील पाण्याच्या हौदात विष टाकून जवळपास १५ मोर, १० माकडे, एक काळवीट व एका नीलगायचा मृत्यू झाला आहे. जामनेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना काल (शनिवारी) याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाळा येथे अनेक शेतकऱ्यांची  शेती आहे. यामुळे वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. वन्यप्राणी त्रास देतात म्हणून सोनाळा येथील एका शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी पाण्याच्या हौदात विष टाकले होते.

यात जवळपास १५ मोर, १० माकडे, एक काळवीट व एका नीलगायचा मृत्यू झाला आहे. गावातील काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला होता. काहींनी मोबाइलमध्ये फोटोही काढले होते. परंतु, गावातीलच रहिवासी असल्याने वाद नको म्हणून हा प्रकार वन विभागापर्यंत पोहोचला नाही. अखेर काल (शनिवारी) रात्री हा प्रकार जामनेर वन विभागाचे वन क्षेत्रपाल समाधान पाटील यांच्या कानावर आली. त्यांनी काल (शनिवारी) रात्रीच घटनास्थळी खोदकाम करून या प्रकारातील सत्यता उघडकीस आणली.

यावेळी फॉरेस्ट गार्ड प्रसाद भारूडे, वनपाल संदीप पाटील, वन मजूर जीवन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

564 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash