Breaking News

 

 

पैसे वाटताना शेकापच्या कार्यकर्त्यांना रंगेहात पकडले…

पनवेल (प्रतिनिधी) : मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचार करताना शेकापच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले आहे. सुकापूर येथे मतदारांना प्रत्येकी २०० रुपये वाटत असताना पनवेल निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शेकापच्या कार्यकर्त्यांना रंगेहात पकडलं आहे.

पनवेल भरारी पथकाने शेकाप पदाधिकाऱ्यांकडून २०० रुपयांची २९ पाकिटंही जप्त करण्यात आले आहे. पैसे वाटण्याबाबत भरारी पथकाने सलग दुसऱ्या दिवशी शेकाप कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. दरम्यान, काल देखील भरारी पथकाने कामोठे येथे पैसे वाटप करणाऱ्या दोन शेकाप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होते. याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे संदीप रामकृष्ण पराडकर, वैभव विठोबा पाटील अशी आहेत.

या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ११ हजार ९०० रुपये रोख, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे निवडणूक चिन्ह, फोटो व नावे असलेली यादी सापडली आहे.

321 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा