Breaking News

 

 

पंतप्रधानांची जात मला माहिती नाही : प्रियांका गांधी

अमेठी (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीवरून केलेल्या विधानाने ठिणगी पडली आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज (रविवार) पंतप्रधानांवर निशाणा साधला. पंतप्रधानांची जात कोणती हे मला आजतगायत माहीत नाही. मला वाटतं विरोधी पक्षाने असलं राजकारण कधीच केलं नाही, असे टीकास्त्र प्रियांका गांधी यांनी सोडले. 

विरोधी पक्ष, त्यातही काँग्रेसचे नेते नेहमीच प्रचारात विकासाच्या मुद्द्यांवर बोलत आले आहेत. आम्ही कधीच कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही, असेही प्रियांका यांनी नमूद केले. जनतेचा आदर करणे, त्यांच्या समस्या सोडवणे हाच सर्वात मोठा राष्ट्रवाद असून काही लोक मात्र जनतेचा आवाज दाबण्याचे काम करत आहेत. याला लोकशाही म्हणता येणार नाही आणि हा राष्ट्रवाद तर मूळीच नाही, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

234 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

 

क्रीडा