Breaking News

 

 

पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग चिखलमय…

रत्नागिरी (प्रतिनिधी) : काल (शनिवार) मध्यरात्री रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर या तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खोदून ठेवण्यात आलेली माती रस्त्यावर आल्याने संपूर्ण महामार्ग चिखलमय झाला आहे. लांजा तालुक्यातील वाकेड घाटात माती आल्याने इथली वाहतूक ठप्प झाली आहे.

रात्री कोसळलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग चिखलमय झाला आहे. चौपदरीकरणाच्या कामासाठी खोदण्यात आलेली माती रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पावसामुळे ही माती संपूर्ण रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचाही वेग कमी झाला होता. रात्रीपासूनच या मार्गावरील वाहने संथगतीने जात आहेत. मातीवरून वाहने घसरण्याचाही धोका निर्माण झाला आहे. लांजा तालुक्यातील वाकेड घाटात माती मोठ्या प्रमाणात आल्याने याठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.

849 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा