Breaking News

 

 

…अन् तांबटीच्या ‘वानरमारी’ कुटुंबांंत उजळले समाधानाचे ‘दीप !

बाजारभोगाव (रवींद्र पाटील) :  देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली आहेत, मात्र दुर्गम भागातील अनेक घरांत ‘प्रकाश’ पोहोचलेला नाहीये. पन्हाळा तालुक्यातील पोंबरे (ता. पन्हाळा) येथील तांबटीच्या जंगलातील वानरमारी समाजातील काही कुटुंबांची हीच अवस्था होती. त्यांच्या घरातील वर्षानुवर्षांचा हा भीषण अंधार मुंबईतील ओम साई राम सेवाभावी ट्रस्ट व जिजाऊ महिला विकास मंडळाने दूर केला अन् या कुटुंबांतील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं चांदणं फुलले.

पोंबरे (ता. पन्हाळा) येथील तांबटीच्या जंगलातील वानरमारी समाजातील काही कुटुंबे वर्षानुवर्षे अंधारातचा चाचपडत होती. त्यांच्याकडे ना आधुनिकतेचा बुरखा पांघरलेल्या समाजाने लक्ष दिले ना राजकीय नेत्यांनी… आपले आयुष्य असेच अंधारात जाणार, आपल्या आयुष्यात कधीच प्रकाशाचा सूर्य उगवणार नाही, या उदासीन भावनेवर ही कुटुंबे जीवन कंठत होती. मुंबईतील ओम साई राम सेवाभावी ट्रस्ट व जिजाऊ महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा नीताताई खोत यांनी पोंबरेपासून साडेतीन किलोमीटर अंतरावरील तांबटीच्या डोंगरात असलेल्या या कुटुंबांची व्यथा समजून घेतली.  वानरमारे कुटुंबांना भेट दिली. त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. त्यांचे राहणीमान ,अडचणी समजून घेतल्या. त्यांचे मन हेलावून गेले.

नीताताई यांनी या समाजाला मायेचा आसरा दिला. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक  कुंटुंबाला सौरलॅम्प देऊन  त्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याने वानरमारी कुटुंबाच्या झोपड्यांमधील काळाकुट्ट अंधार नाहीसा झाला आहे. चहूबाजूंनी कवेत घेतलेल्या त्या फाटक्या छप्परांमध्ये  प्रकाशाची किरणे    फुलल्याने त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. त्यांना त्यांच्या हक्काचे घरकुल बांधण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे अभिवचनसुद्धा त्यांनी दिल्याने वानरमारी समाजामध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. 

या वेळी स्वप्नील डेरी, संदीप खोत, अश्विनी पाटील, काकासाहेब तडाखे, आनंदा पाटील (रा. काळजवडे) उपस्थित होते.

1,512 total views, 3 views today

One thought on “…अन् तांबटीच्या ‘वानरमारी’ कुटुंबांंत उजळले समाधानाचे ‘दीप !”

  1. Very nice news. Needful, neglect unit of the social, that time, social imp like Nitatai. So, thanks to give a this news by livemarathi & thanks to Nitatai & thems team.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे