Breaking News

 

 

नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत अभिषेक वर्माचा सुवर्णवेध

बीजिंग (वृत्तसंस्था) : सध्या बीजिंगमध्ये सुरु असलेल्या नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये भारताच्या अभिषेक वर्मानं भारतासाठी सुवर्णवेध साधला. वर्मानं पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. यासह २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली.

भारताकडून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणारा तो पाचवा नेमबाज ठरला आहे. यामुळं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत पदक मिळवण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. याआधी अभिषेकनं २०१८ च्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.  २०१९ च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. अभिषेकने १० मीटर एअर पिस्तुल प्रकाराच्या अंतिम फेरीत २४२.७ गुणांची कमाई करताना सुवर्णपदकावर नाव कोरलं.

300 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे