गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवडणुकीसाठी प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आली. त्यापैकी पात्र उमेदवारांची यादी आज (बुधवार) जाहीर करण्यात आली आहे. या कारखान्याच्या १९ जागांसाठी ६ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे.

नलवडे साखर कारखान्याच्या १९ जागांसाठी २२३ उमेदवारांनी २६३ अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये ३९ दुबार नामनिर्देशन पत्र होते. त्यापैकी ९ अर्ज अपात्र ठरले असून, २१५ अर्ज पात्र ठरले आहेत. उत्पादक सभासद गटातील ५ मतदारसंघातून १३१, उत्पादक व बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था गटातून १२, अनुसूचित जाती अनसूचित जमाती गटातून १३, महिला राखीव गटातून २८, इतर मागास प्रवर्ग गटातून १६ व विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग गटातून १५ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. छाननीवेळी आक्षेप घेतलेल्या शिवाजीराव दशरथ खोत यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात आला आहे.