Breaking News

 

 

निवडणूक आयोगाकडून गौतम गंभीरवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)  : राजकीय मैदानात उतरलेल्या गौतम गंभीर विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्व दिल्लीमध्ये विनापरवानगी प्रचारसभेचे आयोजन केल्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. शुक्रवारी गंभीरवर मतदार यादीत दोनवेळा नाव नोंदविण्यात आल्याचा आरोप करत गुन्हा नोंदविण्यात आला होता. यामुळे गंभीरसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

पूर्व दिल्लीमधून गंभीरने कोणतीही परवानगी न घेता प्रचारसभा घेतली. याविरोधात आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. यावर आयोगाने दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांना गंभीरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गंभीरचे नाव दोन ठिकाणी असल्याच्या विरोधात आपने दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात गुन्ह्याची तक्रार दाखल केली होती. यावर १ मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

588 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग