Breaking News

 

 

‘लाव रे तो व्हिडिओ’ला ‘आता बघाच तो व्हिडिओ’ने प्रत्युत्तर !

मुंबई (प्रतिनिधी) : ‘ लाव रे तो व्हिडिओ’ असे म्हणत व्हिडिओंच्या माध्यमातून मोदी सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई भाजपचे अध्यक्ष नेते आशिष शेलार यांनी ‘आता बघाच तो व्हिडिओ’ असे सांगत प्रत्युत्तर दिलंय. आज (शनिवार) शेलार यांनी राज यांचा प्रत्येक आरोप फोटो व  व्हिडिओचे पुरावे दाखवूनच खोडून काढला. राज ठाकरेंचा प्रचार फसला आहे. त्यांचा खोटा प्रचार विकला जाणार नाही’, असंही शेलार यांनी सुनावले.

मोदी व शहा हे देशावरचं संकट आहे. हे संकट दूर करा, असं आवाहन राज ठाकरे प्रचारसभांच्या माध्यमातून जनतेला करत आहेत. मोदींच्या कारभाराची चिरफाड करणारे व्हिडिओही ते दाखवत आहेत. त्यांच्या भाषणांची संपूर्ण देशभर चर्चा आहे. त्यामुळं हादरलेल्या भाजपनं राज यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात खास मेळावा घेतला. ‘आता बघाच तो व्हिडिओ… खोलो इसका ‘राज’… अशी या मेळाव्याची थीम होती. राज यांच्या आरोपांना उत्तर देताना शेलार यांनी यावेळी भाजप व सरकारची बाजू मांडली.

बालाकोट एअर स्ट्राइक, पंतप्रधानांच्या दत्तक गावातील वास्तव, मोदी-शहांची हुकूमशाही यावरही शेलार यांनी खुलासा केला. शेलार म्हणाले की, सोशल मीडियावर राज यांच्या विरोधात काही लिहिलं गेल्यास त्यांचे कार्यकर्ते घरी जाऊन मारतात. अशा लोकांनी आम्हाला मुस्कटदाबीविषयी शिकवू नये. भाजपच्या सरकारनं मुस्कटदाबी केली असती तर ठाकरे एवढ्या सभा घेऊ शकले असते का? कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानला दिलेली भेट पुलवामा हल्ल्याशी जोडणारे राज ठाकरे डोक्यावर पडलेले आहेत. पक्षाचे संस्थापक नेतेही सोबत नसलेल्या पक्षाचा नेता शेकडो खासदार, आमदार व नगरसेवक असलेल्या पक्षाला प्रश्न विचारतो हे हास्यास्पद आहे. अकाउंट, स्त्रोत अशा कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारे राज ठाकरे भाजपची बदनामी करत आहेत. ही जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे. 

1,997 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे