राहुल गांधींंनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यास सांगणे धक्कादायक : राधाकृष्ण विखे-पाटील

0 2

नगर (प्रतिनिधी) : मला राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढा असे खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगणे हे धक्कादायक होते. राष्ट्रवादीचे संस्थापक – अध्यक्ष शरद पवार यांनी माझे वडील बाळासाहेब विखे-पाटील यांचा अवमान केल्याने अत्यंत दु:ख झाले. पक्षाकडून मला कोणताच पाठिंबा मिळाला नाही, असे आरोप करीत सध्यातरी मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाहीये. कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे विधानसभेच्या माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जाहीर केले. राजीनाम्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज (शनिवार) दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

पाटील म्हणाले की, राज्यातील काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधला गेला आहे. मी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी साडेचार वर्षे अत्यंत जबाबदारीने सांभाळली. माझ्या पक्षातील सहकाऱ्यांनीच माझ्याविरोधात काम केले. पक्षश्रेष्ठींकडे माझ्याविरोधात चुकीची माहिती दिली गेली. शरद पवार यांनी माझ्या वडिलांवर केलेली टीका वेदनादायी होती. त्यावेळी पक्षातील कोणताही नेता माझ्या पाठीशी उभा राहिला नाही. त्यामुळेच सुजयने पक्ष सोडला. राहुल गांधी यांनी मला राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढायला सांगणे आमच्यासाठी धक्कादायक होते. सध्या तरी मी कोणताच निर्णय घेतलेला नाहीये. मी कार्यकर्त्यांशी, माझ्या समर्थकांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेईन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाटील यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवाराचा प्रचार सुरु केल्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More