Breaking News

 

 

भांडवली मुल्यावर आधारीत कर आकारणीवर स्थायीत चर्चा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  भांडवली मूल्यावर आधारीत कर आकारणीसंबंधी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयासंबंधी महापालिकेचे उच्च न्यायालयातील विधिज्ञ अॅड. अभिजीत आडगुळे यांचा अभिप्राय घेवून कार्यवाही करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या सभेत स्पष्ट केले. आज (शुक्रवार) स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख हे रजेवर असल्याने नगरसेविका सौ. प्रतिज्ञा उत्तुरे यांची अध्यक्षस्थानी एकमताने निवड करण्यात आली.

महिला प्रतिनिधी म्हणून संधी दिल्याबद्दल सौ. उत्तुरे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. भांडवली मुल्ल्यावर आधारीत कर आकारणी संबंधीचा विषय सौ. उत्तुरे यांनी उपस्थित करुन यासंबंधी माहिती देण्यास प्रशासनास सांगितले. मुंबई महापालिकेने भांडवली मुल्ल्यावर आधारीत कर आकारणीसाठी तयार केलेल्या नियमामधील 20,21,22 हे नियम उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. बीपीएमसी अॅक्ट 2010 अशी कर आकारणी करण्यास मनाई केलेली नाही. महापालिकेने या अध्यादेशास आधिन राहून कारवाई केली आहे, त्यामुळे अडचण येणार नाही. तरीही उच्च न्यायालयातील महापालिकेचे विधिज्ञ अॅड. अभिजीत आडगुळे यांचा अभिप्राय घेवून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

या सभेत नाळे कॉलिनीतील सावर्डेकर अपार्टमेंटचे अतिक्रमण, कसबा बावडा पॅव्हेलियन ग्राऊंडवर वाढलेली झाडे यासंबंधीचे प्रश्न नगरसेविका सौ. माधुरी लाड यांनी उपस्थित केले. निवडणूकीच्या कामासाठी अधिकारी व कर्मचारी गेल्याने कारवाई होवू शकली नाही. सोमवारनंतर ही कारवाई केली जाईल. तसेच झाडे तोडण्याचा ठेका संपल्याने व आचारसंहिता असल्यामुळे कामे प्रलंबीत होती आता ती पूर्ण करण्यात येतील.

संदीप कवाळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आचासंहिता शिथील झाल्यासंबंधीचे पत्र किंवा आदेश प्राप्त झालेले नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले. तपोवन झोपडपट्टीतील पुनर्वसन केलेल्या लोकांपैकी 26 लोकांनी घराचा ताबा घेतला आहे. उर्वरीत वारस निश्चित झाल्यावर त्यांना ताबा देऊन झोपड्या काढण्यात येतील, असे प्रशासनाने सांगितले.सौ. प्रतिक्षा पाटील यांनी या संबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता.

पाणीपुरवठा व ड्रेनेजकडील समस्यासंबंधी प्रभागनिहाय बैठकांचे नियोजन करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. सौ. उत्तुरे यांनी आचारसंहिता संपल्याने यासंबंधी बैठका घ्याव्यात अशी मागणी केली होती. कचरा, झाडांच्या फांद्या तोडणे आदी विषयांवर या सभेत चर्चा झाली.

168 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा